मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात, आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Foto

मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता या आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्चन्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी केलेली आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य आहे असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल होवू शकते ही संभाव्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणाऱ्या विनोद पाटील यांनी यापूर्वीच कॅव्हेट दाखल केले आहे. मागील सरकारने दिलेले आरक्षण कोर्टाने रद्द केले होते. त्यामुळे आता मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी(ता.३) सकाळी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.